*


उस्मानाबाद/ प्रतिनिधी:-राज्य शासनाने“महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम,2020”प्रसिद्ध केला आहे. यातील नियमानुसार करोना विषाणुमुळे  उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दि.01 ते 31 मार्च -2021 च्या रात्री 12 वाजे पर्यंत जिल्हयात लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आला आहे.

      जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कौस्तुभ दिवेगावकर यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 मधील तरतुदींनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

        आदेशाप्रमाणे गृह विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तीविरोधात  दंडात्मक कारवाई करण्याबाबतचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. गैरकृत्यांबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश या  आदेशासोबत लागू राहतील.तसेच राज्य शासनाने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वी  वेळोवेळी अन्य कोणत्याही विशिष्ट/सर्वसाधारण आदेशानुसार परवानगी दिलेल्या बाबी परवानगी आदेशात नमूद केलेल्या अटी तसेच शर्तींसह चालू राहतील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम 2020 मधील नियम 11, साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.या आदेशाची अंमलबजावणी दि. 01 मार्च-2021 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

                                ******

 
Top