उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राज्यात, विभागीय, जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागांद्वारे शासकीय वसतिगृह योजना कार्यान्वित आहे. 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून मोठी शहरे (महानगरांमध्ये) विभागीय स्तर, जिल्हा स्तरावर आहेत. तालुकास्तरावर इयत्ता दहावी नंतरच्या दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडित दीन दयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनेंतर्गत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या आधारसंलग्न बैंक खात्यात थेट रक्कम वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.त्यासाठी अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्या-त्या अभ्यासक्रमाचे निकाल लागल्यापासून swayam.mahaonline.gov.in या संकेत स्थळाद्वारे दि.15 मार्च, 2021 पर्यत ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी,असे आवाहन सोलापूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शुभांगी कांबळे यांनी केले आहे.

   महानगरपालिका/नगरपालिका हद्दीमध्ये आणि महानगरपालिका/नगरपालिका हद्दीपासुन पाच कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात/शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. संपर्कासाठी प्रकल्प कार्यालयाचा पत्ता: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर. प्लॉट नं-2 डॉ बाबासाहेब आंबेडकर सोसायटी आर्कीटेक्ट कॉलेजजवळ, कुमठा नाका परिसर, सोलापूर.  दुरध्वनी क्र.0217-2607600 संपर्कासाठी माहिती:-विशाल सरतापे,प्रभारी सहा.प्रकल्प अधिकारी (शिक्षण)मोबाईल क्रमांक-8668774254 यांच्याशी संपर्क साधावा,असेही आवाहन श्रीमती कांबळे यांनी केले आहे.

 
Top