शिराढोण / प्रतिनिधी- 

पाणी असो किंवा नसो दुष्काळ कायम निसर्गाच्या कोपापेक्षाही भयंकर परिस्थितीचा सामना बागायती शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शिराढोण येथील ३३ के.व्ही. वादग्रस्त विद्युत केंद्राचा होत असल्याने अभियंत्याचे नियंत्रण नसल्याने पुरवठा ठप्प झाला आहे. शिराढोण ३३ के.व्ही. विद्युत केंद्राला मुरूडहून पुरवठा होतो. परंतू दररोज पुरवठा मुरूडहून खंडीत होतो. ३३ के.व्ही. लाईन फॉल्टचे कारण सांगत पुरवठा तांस-तास बंद ठेवला जातो. मुरूड विद्युत केंद्राला शिराढोण विद्युत केंद्राचे अभियंता धुमाळ यांनी मॅसेज केल्याशिवाय तेथील ऑपरेटर साधी ट्रायलही घेत नाहीत. परंतू अभियंता धूमाळ यांचा फोन नॉटरीचेबल राहत असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

शिराढोणचा पुरवठा कमी जास्त दाबेचा होत असल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या मोटारी, विद्युत पंप जळत आहेत. शिराढोण गाव हे गावठाण योजनेत आहे. गावठाण् योजनेचे काम अितशय खराब  झाल्याने वारंवार फीडर बंद पडत असल्याची माहिती विद्युत वितरणचे कांही कर्मचारी  देत असल्याने अभियंता व गुत्तेदार तसेच गावठाणच्या कामाची चौकशी व्हावी व पुरवठा सुरूळीत करण्याची मागणी शेतकरी संघटनेसह परिसरातील शेतकरी करत आहेत. तसेच आनागोंदी कारभार थांबवून पुरवठा सुरूळीत नाही झाला तर तिव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

 
Top