उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

नॅचरल  शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणी या कारखान्याच्या नॅचरल डेअरी विभागाने कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांची निकड लक्षात घेवून, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणेसाठी अत्याधुनीक दुधभूकटी  प्रकल्प उभा करणार असल्याचे नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी सांगितले.

 नॅचरल डेअरीचे दशकपूर्ती सोहळयाचे निमित्ताने नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी डेअरीचे कामकाजा बाबत समाधान व्यक्त करून कौतुकोद्गार काढताना साखर कारखान्याची वार्षिक उलाढाल 250 कोटी आणि नॅचरल डेअरीची वार्षिक उलाढाल 100 कोटींची असल्याचे नमूद केले. नॅचरल डेअरीचे यशाचे गमक त्यांनी अगदी थोडक्यात सांगताना नॅचरल डेअरीने महिन्यातील 4, 14 आणि 24 तारीख ही दुध उत्पादकांची पेमेंटची असते आणि ती आम्ही मागील दहा वर्षात कधीही चुकू दिली नसल्यामुळे आणि मार्केट मध्ये जाणारे दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे गुणवत्तेला दिलेले प्राधान्य. नॅचरल डेअरीचे यशा मध्ये दूध उत्पादकां बरोबरच दूध संकलक, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री वितरक यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे ठोंबरे यांनी सदर प्रसंगी आवर्जून सांगितले. नॅचरल डेअरीचे दशकपूर्ती सोहळया मध्ये प्रथम तीन दूध संकलक आणि दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारे वितरक यांचा शाल, श्रीफळ, पुश्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देवून योग्य तो सन्मान करण्यात आला. तसेच डेअरी विभागा कडील कर्मचा-यांचे अभिनंदन करून नॅचरल डेअरीचे दशकपूर्ती निमीत्त डेअरीचे सर्व कर्मचा-यांना एक दिवसाचा पगार बक्षीस रोखीने देणार असल्याचे कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी सांगितले.

नॅचरल डेअरीच्या दशकपूर्ती सोहळया निमित्त डेअरीचा लेखाजोखा नॅचरल शुगरचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी मांडला. नॅचरल डेअरी पहिले दोन वर्षे तोटयात असतानाही नॅचरल शुगरचे कार्यक्षेत्रातील दुध उत्पादकांसाठी डेअरी सुरू ठेवली आणि त्याचे अवघ्या दहा वर्षांमध्ये वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्याचे दिसून येत आहे असे ही आवाड यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीमध्ये मराठवाडया मधील शेतक-यांना दुग्ध व्यवसायानेच तारले असल्याने दुग्धोत्पादनाचे महत्व जाणून घेवून नॅचरल डेअरीचे कार्यक्षेत्रातील दुध उत्पादक शेतक-यांचे संपूर्ण दुध यापुढे स्वीकारले जाईल आणि त्यामुळेच नॅचरल डेअरी येत्या 1 एक वर्षाचे कालावधी मध्ये अत्याधुनीक दुध भूकटी प्रकल्प उभारणार असल्याचे कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी सांगितले.

सदर दशकपूर्ती सोहळयास लाभलेले अध्यक्ष नॅचरल शुगरचे जेष्ठ संचालक ज्ञानेश्वरराव काळदाते यांनी डेअरीचे पुढील वाटचालीस व यशस्वीतेस शुभेच्छा दिल्या. नॅचरल डेअरीचे दशकपूर्ती सोहळयास उपस्थितांचे श्रीपाद ठोंबरे यांनी आभार मानले.सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, डेअरीचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाचे नियमांचे काटेकोरपेणे पालन करून नॅचरल डेअरीचे दशकपूर्ती सोहळयास उपस्थित होते.


 
Top