लोहारा/प्रतिनिधी 

यशवंतराव चव्हाण कृषी उत्पादने वि.संस्था नागुर ता.लोहारा यांच्या वतीने दि महाराष्ट्र स्टेट को - ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि., उस्मानाबादच्या वतीने सन 2020 -- 21 खरीपासाठी किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ लोहारा शहरातील कानेगाव रोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यामध्ये किल्लारी सह.साखर कारखान्याचे संचालक शिवाजी अप्पा कदम यांच्या हस्ते दि.4 मार्च 2021 रोजी करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून 

शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, संस्थेचे चेअरमन विनोद जावळे पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर माळी, नगर परिषद गटनेते अभिमान खराडे, प्रताप पाटील, तलाठी जगदीश लांडगे, पं.स.माजी सदस्य सुधीर घोडके, कुलदीप गोरे, गणेश भरारे, अदि उपस्थित होते. सदर केंद्रावर धान्य आणताना शेतकऱ्यांनी मालातील खडे, माती व काडी कचरा नसलेला व न भिजलेला, मालाची आर्द्रता 12 टक्के पेक्षा कमी असावी, खरेदी केंद्रावर येताना शेतकऱ्यांनी सातबारा व आठ अ उतारा, तलाठ्याचा पीकपेरा प्रमाणपत्र, आधार कार्ड, आधार कार्ड लिंक असलेल्या बॅंकेच्या चालू पासबुकाची झेरॉक्स, खरेदी केंद्रावर आणलेल्या मालाचे वजन झाल्यावरच ऑनलाईनद्वारे काटा पावतीनंतर शेतकऱ्यांचे पेमेंट ऑनलाईन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. कृपया शेतकऱ्यांनी शेतमाल नमुना अगोदरच तपासून घेऊन शेतमाल केंद्रावर आणावा. तुर हमीभाव सहा हजार तर हरभरा 5100 रुपये प्रती क्विंटल दराने माल घेण्यात येत असून मालाची ऑनलाईन नोंदणी नि: शुल्क करता येईल असे केंद्राचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर सोमवंशी यांनी माहिती दिली.


 
Top