उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हयात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आळणी येथील जिल्हा परिषद शाळा येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.

 यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, सभापती पंचायत समितीच्या श्रीमती हेमाताई पांदणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे यांच्यासह गटविकास अधिकारी  श्रीमती समृध्दी दिवाने,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी,डॉ कुलदिप मिटकरी, गटशिक्षण अधिकारी श्रीमती रोहिणी कुंभार,आळणीचे उपसरपंच कृष्णा गाडे,तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत ऐबाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावित डॉ.वडगावे यांनी केले.जंतापासुन होणारे आजार आणि प्रतिधात्मक उपाय योजना या बाबत सविस्तर माहिती त्यांनी त्यावेळी दिली.

  लहान मुल-मुलींमध्ये मध्ये जंत होण्याचे कारण म्हणजे अस्वच्छता आहे. त्यामुळे जंत होण्यास मदत होते. तसेच शाळेबरोबरच गावांमध्ये स्वच्छता असणे गरजेचे आहे. स्थानिक पदाधिकारी,शिक्षक,ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी यांनी एकत्रित काम केल्यास गाव स्वच्छ राहिल आणि जंता बरोबरच इतर आजारांचा प्रार्दुभाव होणार नाहीत. शासनाच्या महिला सक्षमीकरणाबाबत अनेक योजना राबविण्यात येत आहेत.सर्वानी एकत्रित येवून काम करावे.महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होवून महिला संक्षम होतील. दि.1 ते 8 मार्च 2021 या कालावधीत राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यात येत असुन ही मोहिम सर्वांच्या सहकार्याने  करावे,असे आवाहन श्रीमती कांबळे यांनी यावेळी केले.

  जिल्हा परिषदेची शाळा सुंदर असून शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा. त्याबरोबर शाळेतील विद्यार्थ्या हे भावी जीवनातील आदर्श नागरिक व्हावेत,यासाठी आदर्श विद्यार्थ्या घडविण्याचे काम शिक्षकांबरोबर पालकांनी करावे.गाव स्वच्छ ठेवून गावामध्ये वृक्ष लागवड करावी.राष्ट्रीय जंतनाशक मोहिम यशस्वी करावी.असे आवाहन डॉ.फड यांनी यावेळी केले.

 या कार्यक्रमामध्ये होमीभाभा ॲस्ट्रॉनॉमी कल्ब चे उद्घाटन करण्यात आले. ई लर्निग कक्षांची पाहणी मान्यवरांनी केली.या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ.मोरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.क्षिरसागर,उपकेद्र आळणीच्या समुदाय अधिकारी डॉ.ज्योती बिराजदार-वडगावे,अध्यक्ष शालेय समितीचे विजयकुमार नांदे,आरोग्य सहाय्यक श्री.पांचाळ,शालेय विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top