परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा तालुक्यातील तांदूळवाडी येथील रहिवासी असलेले व सध्या जिल्हा परिषद शाळा देऊळगाव येथे कार्यरत असलेले शिक्षक सुबराव सुरवसे यांचा मुलगा सुशांत सुरवसे याचा बीएचएमएस मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथे प्रवेश  झाल्याने मुलगा नि वडील यांचा प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ग्रामीण भागातून विद्यार्थी आपल्या अथक अभ्यासाचे तसेच परिश्रमाचे जोरावर गुणवत्ता सिद्ध करून परंडा तालुक्याचा मान सन्मान वाढवत  येणाऱ्या या नविन विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करतआहेत.

पुढील शैक्षणिक कार्यासाठी उर्जा नि प्रेरणा मिळावी व भावी जीवनात चांगले कर्म घडावे या सद्भावनेतून सन्मान सत्कार करण्यात आला. यावेळी प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना उस्मानाबाद चे जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत, परंडा तालुका नेते लक्ष्मण औताडे, तालुका उपाध्यक्ष शहाजी झगडे,संत ज्ञानेश्वर विद्यालय तांदूळवाडी चे मुख्याध्यापक  राम पाटील,माजी सरपंच बाजीराव दुरूंदे तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top