कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची गेल्या 1 एप्रील 2023ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षात 90 कोटी रुपये आर्थिक उलाढाल तर 2 कोटी 60 लाख रुपये नफा झाला असल्याची माहीती शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.

कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था ही राज्यातील पथदर्शी व पारदर्शी कारभार असलेली पतसंस्था म्हणून राज्यभर गणली जाते. राज्यातील अनेक सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी या पतसंस्थेचा कारभार पहायला येतात. गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच वर्चस्व या पतसंस्थेवर आहे. प्रत्येक वर्षी या पतसंस्थेचा प्रगतीचा आलेख उंचावत ठेवण्यात संचालक मंडळ यशस्वी झालेले आहे.

गेल्या 2023 -2024 या आर्थिक वर्षात संस्थेची आर्थिक उलाढाल जवळपास 90 कोटी रुपये झाली असून सभासदांना 43 कोटी 87 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेत सभासदांनी 25 कोटी 28 लाख रुपये कायम तर 8 कोटी 82 लाख रुपये मुदत ठेवी ठेवल्या आहेत. संस्थेचे भागभांडवल 4 कोटी 38 लाख असून  संस्थेस गेल्या आर्थिक उत्पन्न 3 कोटी 54 लाख मिळाले असून एकुण नफा 2 कोटी 60 लाख रुपये झाला आहे.

 शिक्षक पतसंस्थेत सभासद हिताच्या अनेक योजना राबवल्यात जात असून  त्यात प्रामुख्याने सभासदांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी 11 हजार रुपये कन्यादान, सभासदाचा कोणत्याही कारणांमुळे मृत्यू झाल्यास त्या सभासदाचे संपुर्ण कर्ज माफ योजना ,सभासदांच्या गुणवंत पाल्याचा प्रत्येक वर्षी गुणगौरव, उच्चांकी 15 टक्के  लाभांश देणारी व सर्वांत 8-5 टक्के व्याज दरांने कर्ज देणारी एकमेव पतसंस्था आहे. संस्थेच्या या प्रगतीस पतसंस्थेचे उपाध्यक्ष भागवत जाधवर, संचालक भक्तराज दिवाने, दत्तात्रय पवार, भुषण नानजकर, गणेश कोठावळे, दत्तात्रय सुरेवाड, रविंद्र शिनगारे, अशोक डीकले, दिपक चाळक, रामचंद्र पवार, सुनिल बोरकर, श्रीमती वैशाली क्षिरसागर, श्रीमती ज्योती ढेपे, श्रीमती कालिंदा मुंढे व सचिव संतोष ठोंबरे तसेच प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व सर्व क्रियाशील सभासद यांचे मोठ योगदान असल्याचे तांबारे यांनी सांगितले.


 
Top