उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

तालुक्यातील दारफळ येथे कोरोणा रुग्ण आढळून आल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोणा पासुन बचावासाठी सरपंच अॅड. संजय भोरे यांनी मार्गदर्शन केले. 

दरवेळी साबणाचा वापर करून हात व पाय स्वच्छ धुण्याबरोबरच तोंडावर मास्क कायम लावावा असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.दारफळ येथील दोघांचे रिपोर्ट्स पॉजीटिव आले असले तरी त्यांच्या संपर्कातील इतर बारा जणांचे अॅंटिजन रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याने संसर्गाचा धोका टळला आहे. असे असले तरीही विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यानंतर इतरत्र कुठेही न फिरता ऑनलाईन अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे देखील त्यांना सांगत आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले.

 यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष किशोर घुटे, मुख्याध्यापक कांबळे सर, जहागीरदार सर, हाके सर, मसे सर, धर्मराज जाधव, हेमंत सुरू, प्रकाश घुटे, बजरंग मक्के, सुनील भूतेकर आदींसह शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


 
Top