उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने  शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या १०० दिवसापासून ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंब्यासाठी व पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ इंधनावर प्रचंड प्रमाणात कर लावून केंद्र सरकार दिवसा ढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडे टाकत आहे. ते तीन काळे कायदे रद्द करावेत, पेट्रोल, डिझेल व गॅसचे वाढलेले भरमसाठ दर मागे घेण्यात येऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री रमेश बागडे यांच्या नेतृत्वाखाली दि.२६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान जनतेला प्रत्येक भारतीयांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील यासह इतर आश्वासने दिली होती. त्याची पूर्तता तर केली नाहीच. उलट पेट्रोल १०० रुपये प्रति लिटर, डिझेल ९२ प्रति लिटर व गॅस सिलेंडर ८५० रुपये महाग केला आहे.  याविरोधात काँग्रेसच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चव्हाण,  गोदावरीताई केंद्रे, प्रकाश चव्हाण , अग्नीवेश शिंदे, विलास शाळू , खलील सय्यद , सिद्धार्थ बनसोडे , धनंजय राऊत, ॲड विश्वजीत शिंदे, देवानंद एडके,  दिपक जवळगे, दौलतराव माने, हरिभाऊ शेळके , महेबुब पटेल, कानिफनाथ देवकुळे, शामराव भोसले, बाबुराव तवले ,काका सोनटक्के , बापू हाटकर, विनोद वीर, अमर माने, पांडूरंग सोनकवडे ,बालाजी बंडग, कुंदले गुरुजी, किशोर पाटील, अॅड दर्शन कोळगे, अभिजीत देडे, ॲड गणपती कांबळे, अँड राहुल लोखंडे, रोहित पडवळ, अनंत तागडे, जावेद काझी, प्रा.मधु पाटील , अमोल समुद्रे, दत्ता तिवारी, सुनिल मडके, शहाजी मुंडे, बाळसाहेब गपाट, सतिश केंद्रे, पांडूरंग सोनकवडे, भागवत जीटिथोर, ऋषीकेश म्हंकराज, आयुब पठाण,  रामचंद्र कोळे, कफिल सय्यद, सुभाष हिंगमिरे ओमप्रकाश भुजबळ बाबासाहेब देशमुख प्रणित डिकले अनंतराव घोगरे कृष्णा तवले सुरज लातूरे समाधान घाटशीळे श्रीधर जाधव अशोक कंदले, अभिजीत मेनकुदळे, राजेंद्र जाधव, अवधुत क्षिरसागर, रमेश सावते, इरफान तांबोळी, अरुण कोळगे, मेहराज शेख

 आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख कार्यकर्त्याची भाषणे झाली कार्यक्रमाच्या शेवटी रमेश बागवे व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील यांनी मार्गदर्शन केले व शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली  काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी मान्यवरांचे व उपस्थित अंदोलकाचे आभार मानले.

 
Top