कळंब / प्रतिनिधी- 

 अर्थसंकल्पीय अधिवेशनात मातंग व तत्सम समूहाच्या विकासासाठी बजेटमध्ये कोणतेही आर्थिक तरतूद केली नसल्याने महाराष्ट्र शासनाचा यावेळी लहुजी शक्ती सेना कळंब तालुक्याच्या वतीने निषेध करण्यात आला.  

कळंब तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे नमुद केले कि   मातंग समाजाचे अस्मिता असलेले संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे मुंबई येथील राष्ट्रीय स्मारकास व पुणे येथील आद्यक्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकास  अर्थसंकल्पीय बजेट मध्ये एक रुपयाची सुद्धा तरतूद करण्यात आली नाही. तसेच साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासाठी कसल्याही निधीची तरतूद केलेली नाही हा मातंग समाजावर महाराष्ट्र शासनाकडून झालेला अन्याय आहे .

या अन्यायाचा लहुजी शक्ती सेना कळंब तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी डोक्याला काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध केला. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे उस्मानाबाद जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष बालाजी गायकवाड, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कदम, कळंब तालुका प्रसिद्धीप्रमुख विकास गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष दीपक सहाने,तालुका सचिव बालाजी उपरे, तालुका उपाध्यक्ष सुदेश शिंदे, मोहन कसबे, दीपक कसबे, शंकर ताटे, खंडू ताटे माया शिंदे, रामकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.

 
Top