कळंब / प्रतिनिधी- 

8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कळंब शहरातील आरोग्य सेवा, पोलीस सेवा ,वाहतूक विभाग,महसूल, शैक्षणिक, विधी क्षेत्र व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजाच्या प्रति आपली सेवा समर्पित करणाऱ्या कर्तव्यदक्ष महिलांचा कळंब तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने सन्मानपत्र, गुलाब पुष्प देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

  या कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष महादेव महाराज आडसुळ, कार्याध्यक्ष डॉ. माणिकराव डिकले,उपाध्यक्ष अँड. त्रिंबकराव मनगिरे, सचिव डी के कुलकर्णी, सहसचिव माधवसिंग राजपूत, विलास करंजकर, सुभाष घोडके, गुणवंत कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अच्युतराव माने, सामाजिक कार्यकर्ते सचिन शिरसागर यांनी केले.  विविध कार्यालयात या सत्कार प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती. यात डॉक्टर जीवन वायदंडे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कळंब, तानाजी दराडे पोलीस निरीक्षक कळंब,कोमटवार बस आगार व्यवस्थापक, मानवी हक्क अभियान चे अध्यक्ष बजरंग ताटे, हनुमंत पाटोळे लहुजी शक्ती सेना, हनुमंत पाटोळे,प्रभाकरराव खंडागळे, आगार सह व्यवस्थापक भारती, रूपचंद जगताप, गोरे,भाकरे,किरण मस्के,अविनाश घोडके यांची उपस्थिती होती. सत्कारही करण्यात आलेल्या महिला ग्रामीण रुग्णालय कळंब डॉक्टर शोभा जीवन वायदंडे वैद्यकीय अधिकारी कळंब,महादेवी गोरे, परिचारिका शेख गोस्वामी, गोसावी वाघमारे, मुळे, गरगटे, सुषमा मदिना, शेख शिंदे,सरस्वती आडसूळ,डॉ. शोभाताई पाटील सह्याद्री हॉस्पिटल, दाते,डोळे डॉ. भालेराव,डॉक्टर जोशी कळंब बस आगार प्रियंका शिंदे, वंदना मुळे, वाहक वैशाली करडे, तसलीम शेख,वंदना पालके, अलका भोसले, अश्विनी बिडवे,संध्या राऊत, परविन पठाण नायब तहसीलदार कळंब, विधी एडवोकेट शकुंतला फटक, सावळे एडवोकेट भाग्यश्री मुंडे,पोलीस स्टेशन कळंब म पो का संजीवनी वडकर,रेश्मा ओव्हाळ, यांचा सत्कार तर माया शिंदे, सामाजिक कार्य शैला शिंदे यांना शैक्षणिक कार्य सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले .

 
Top