उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 शहरात गेल्या ४ ते ५वर्षापासुन सि.टी.बस सेवा बंद आहे त्यामुळे प्रवाशांचे  अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे उस्मानाबाद  शहरात सि.टी.बस सेवा चालू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  सध्या कोव्हिड १९ पार्श्वभूमीवर व्यवसायिक व मजुरी करणारे गरीब नागरिकांना वेळेवर काम मिळत नसल्या कारणाने त्यांची हाल-अपेष्टा होत आहे त्यातच खाजगी वाहन धारकाने आपले भाडेवाढ करून नागरिकांना व प्रवाशांना आणखीनच अडचणीत आणले आहे त्यात खाजगी रिक्षा, टमटम,ईतर यासारखी वाहने जास्तीचे भाडे आकारत असून यामुळे प्रवाशांची व नागरिकांची लूट होत आहे. त्यामुळे मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी दिनांक ५ मार्च राजी विभाग नियंत्रक रा.प उस्मानाबाद व मुख्याधिकारी नगरपरिषद उस्मानाबाद यांना निवेदन देऊन उस्मानाबाद शहरात लवकरात लवकर सि.टी.बस सेवा चालू करावी, अशी मागणी केली आह.े यावेळी पृथ्वीराज शिंदे, सौरभ देशमुख,धिरज खोत उपस्थित होते

 
Top