परंडा / प्रतिनिधी : -  

केंद्र सरकारने देशातील शेतकरी व शेती संदर्भात पारित केलेले तीन कायदे त्वरित रद्द करण्यासाठी परंडा तहसील कार्यालया समोर शुक्रवार दि.५ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करून तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना निवेदन दिले.

हे आंदोलन वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष दिपक ओव्हाळ यांच्या नेतृत्वा खाली शेतकरी विरोधी कायदे त्वरित रद्द करणे बाबत आंदोलन करण्यात आले.या वेळी स्वराज्य बहुउद्देशीय संस्था संचलित माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या संघटनेच्या वतीने या एकदिवशीय धरणे आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा दिला.यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के,जिल्हा सहसचिव मोहनदादा बनसोडे,जिल्हा कार्यकारणी सदस्य तानाजी बनसोडे,वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव दयानंद बनसोडे, तालुका संघटक मधुकर सुरवसे, तालुका कोषाध्यक्ष दिपक पोळ, सदस्य भाग्यवान शिंदे,नागेश थोरात,अंकुश दाभाडे,वंचित बहुजन आघाडीचे नेते किरण बनसोडे, प्रकाश बनसोडे,संजयशिंदे,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अध्यक्ष फारूक उस्मान शेख,सचिव नवनाथ कसबे ,समीर शेख, इक्बाल मुबारक शेख, कानिफनाथ सरपने आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारने देशातील शेतकरी व शेती संदर्भात पारित केलेले कायदे 1) शेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020

2) शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020

3) अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती)कायदा 2020

वरील तीन ही शेतकरी विरोधी कायदे त्वरित रद्द करण्या साठी ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र भर जिल्हाधिकारी कार्यालय,उपविभागीय कार्यालय,तहसील कार्यालय समोर राज्यव्यापी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे आदेश देण्यात आले होते.या अनुषंगाने तहसील कार्यालय परंडा येथे एकदिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष दिपक ओव्हाळ यांच्या नेतृत्वा खाली संपन्न झाले.या एकदिवशीय धरणे आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा म्हणून निवेदनावर वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा सहसचिव रमा विश्वास बोकेफोडे, दिपक उमराव गायकवाड,अंकुश रामचंद्र दाभाडे,किरण माणिक बनसोडे,दयानंद गोरख बनसोडे,ओव्हाळ मोहन गणपत,ओव्हाळ मारुती पंढरी,दिलीप नामदेव सुरवसे,मोहनदादा बनसोडे,ओव्हाळ भगवान देवराव,दिपक वाल्मीक पौळ,संदीप अर्जुन बनसोडे,भाग्यवंत गोवर्धन शिंदे,राहुल बनसोडे,शिवाजी बनसोडे,नागनाथ महादेव थोरात,महावीर बनसोडे,श्रावण लक्ष्मण दाभाडे, मधुकर सुरवसे, सहदेव दगडू बगाडे,ओव्हाळ हिरालाल अंबादास,ओव्हाळ कचरू कोंडीबा,नवनाथ एकनाथ कसबे,धनंजय सोनटक्के, गणेशसिंह सदीवाल,जगन्नाथ आनंदा सरवदे, कानिफनाथ गोरख सरपने,सुभाष सुखदेव मारकड,शहजाद रसूल चौधरी, असलम जैनुद्दीन सय्यद,बापूराव कल्याणराव भोसले,शेख फारुख उस्मान,भैरवनाथ गोडगे श्रीराम गोडगे,चंद्रकांत लटके,राजेंद्र चव्हाण,शिवाजी गायकवाड,अन्वर युसुफ मनियार, प्रदीप अरुण परिहार,बोकेफोडे विश्वास मनमत,शुकून अगबर मुलानी,गुलाम मुलानी,प्रकाश बनसोडे,बालाजी मधुकर ठोसर,एकबाल मुबारक शेख, यांच्या सहआदी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

 
Top