तुळजापूर / प्रतिनिधी : - 

 रेशन धान्य वाटप करण्यासाठी दिलेल्या ईपोस मशीन १मार्च पासुन बंद असल्याने त्या मुळे आज पंधरा दिवस झाले तरी धान्य वाटप होवु शकले नाही तरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी यात तात्काळ लक्ष घालुन धान्य वाटपातील अडथळा दूर करावा , अशी मागणी जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदन देवुन केली आहे.

निवेदनात म्हटलं आहेद कि, दर महिन्याला एनआयसीकडुन ईपोस मशीनचा डाटा घेतला जातो त्या साठी  काही वेळ  बंद केल्या जातत परतु गेल्या पंधरा दिवासा पासुन मशीन बंद आहेत मार्च 2021चे धान्य वाटप अधाप केले नाही पुरवठा विभागाने रैशन माल रेशन दुकानात पोच केला आहे परंतु ईपोस मशीन नसल्यामुळे धान्य वाटप करणे शक्य होत नाही याच महिन्यात बोगस शिधा पञिका तपासणी अंतर्गत शोध  मोहीम फाँर्म चे शिधापञिका धारकांना वाटप केल्याने ते फाँर्म जमा करताना सुध्दा प्रत्येक कार्ड धारकांना समजावणे कठीण होत आहे.मशीन कधी सुरु होणार याची माहीती दिली गेली नाही विचारणा केली असता तांत्रिक कारण सांगितले जाते ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत दुकानातील धान्य माल उदंरे फस्त करीत आहे तरी धान्य वाटपातील अडथळा दूर करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

 

 
Top