उस्मानाबाद/ प्रतिनिधी;

शहर व परिसरातील शेकडो तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, प्रा.सुशील शेळके, जीवनराव गोरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. रोजगाराच्या संधी, उद्योग व्यवसायामध्ये असलेल्या नवनवीन संधी, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेल्या करिअरच्या संधी मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, असे मत या तरुणांनी व्यक्त केले.

यावेळी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मसुद शेख, तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, उस्मानाबाद नगर परिषदेचे गटनेते गणेश खोचरे, तुळजापूर शहर उपाध्यक्ष मकसूद शेख, तुळजापूर तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग तोफिक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी प्रवक्ता प्रशिक्षण विभागाच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी त्रिगुणशील सोळुंके यांची निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित युवकांना प्रा.सुशील शेळके यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी अनिकेत नाडे ,राहुल राठोड ,सुमित चिलवंत, संजय पवार ,तिरुपती उघडे, अथर्व मार्कंडे ,सुरवसे हर्षवर्धन, वाघमारे कुणाल, कृष्णा कदम, संतोष कांबळे, योगेश राठोड, रितेश झेंडे, अक्षय राठोड, विशाल गायकवाड, राज पाटील, मुंडे पाटील, सौरभ गोरे, रोहित शिंदे, संदेश सोनवणे, अभिषेक कांबळे, अब्दुल शेख, विवेक तुपसुंदरे यांनी पक्षप्रवेश केला.

Top