उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात दि.08 ते 13 मार्च 2021 दरम्यान जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात येत आहे.येथील जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात काचबिंदू सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के. पाटील हे होते.

 यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सचिन देशमुख,डॉ.ईस्माईल मुल्ला,डॉ.सतीश आदटराव, डॉ.गणेश पाटील,डॉ.अश्विनी गोरे, डॉ.परवीन मुल्ला, तसेच नेत्रविभागाचे प्रमुख नेत्र शल्यचिकित्सक डॉ.अर्चना गोरे ,डॉ.मुस्तफा पल्ला,डॉ.विरभद्र कोटलवाड,डॉ.महेश पाटील,अधिसेविका श्रीमती नलिनी दलभंजन यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रभारी राऊफ शेख, नेत्रचिकित्सा अधिकारी शेख अयुब, बाळासाहेब घाडगे आणि सर्व नर्सिंग स्टाफ रुग्णालयील कर्मचारी,रुग्णालयात तपासणीसाठी आलेले रुग्ण व नातेवाईकांची उपस्थिती होती.

 या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.भालचंद्र आणि धन्वंतरी यांच्या प्रतिमेस जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.डी.के. पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अर्चना गोरे यांनी केले. डॉ. एम.डी. पाटील यांनी उपस्थित सर्वाना काचबिंदू म्हणजे काय, काचबिंदू होण्याचे कारण, काचबिंदू होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, काचबिंदूचे समाजात वाढत असलेले प्रमाणे तसेच वय वर्ष 40 नंतर प्रत्येक व्यक्तीने आणि ज्या व्यक्तीला मधुमेह हा आजार आहे. अशा व्यक्तींनी किमान सहा महिण्यातून एकदा तज्ज्ञ डॉक्टरामार्फत डोळयांची तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन काचबिंदूचे लवकर निदान करुन त्यावर योग्य उपचार करुन येणारे काचबिंदूमुळे येणारे अंधत्व नियंत्रणात ठेवता येऊ शकते.असे सांगितले.

 यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयातील महिला वैदयकीय अधिकारी अधिपरिचारिका यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नेत्रविभागात मोतिबिंदू शस्त्रक्रियाकरिता आलेल्या रुग्णांपैकी महिला रुगण आणि त्यांच्या सोबत आलेले महिला नातेवाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी नेत्रविभागाती सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व नर्सिंग स्टॉफ यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन नेत्रिचिकित्सा अधिकारी अयुब शेख यांनी केले.

 
Top