उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयामध्ये दि.10 एप्रिल,2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकार आणि नागरिकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होवून लाभ घ्यावा,असे आवाहन प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. जी. देशपांडे, यांनी केले आहे.    

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार लोकन्यायालय आयोजित करण्यात आलेले आहे.उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयासह उस्मानाबाद जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्टची प्रकरणे, बँकाची कर्ज वसुली वगैरेची प्रकरणे,मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे,कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, विद्युत कायद्यानुसार समझोतायोग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्याअगोदरची दावा दाखल पूर्व प्रकरणे आपआपसात समझोत्याकरीता ठेवून ती सामजस्यांने सोडविण्याचे आवाहन देशपांडे, आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. बी. तोडकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवावयाची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा  येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे स्वतः येवून किंवा हेल्पलाईन फोन नं. 02472-225424  वर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 
Top