उस्मानाबाद /प्रतिनिधी :- उस्मानाबाद शहरात 21 मार्च 2021 रोजी  होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 करिता उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण 13 उपकेंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत.परंतु दर रविवारी जनता कर्फ्यु  जाहीर करण्यात आलेला असल्याने दि.21 मार्च 2021 रोजीच्या या परीक्षेच्या  परीक्षार्थी उमेदवारांना  आणि परीक्षेकरिता नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना परीक्षा उपकेंद्रावर विहित वेळेपूर्वी पोहोचता येणे सोईचे होण्यासाठी दि.21 मार्च 2021 रोजी फक्त उस्मानाबाद शहरातील ॲटोरिक्षा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली  आहे.

दिलेली ही सूट केवळ दि.21 मार्च 2021 रोजीच्या जनता कर्फ्यु रोजी व केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 या परीक्षेच्या परीक्षार्थी उमेरवारांना व परीक्षेकरिता नियुक्त अधिकारी, कर्मचारी  यांना लागू राहील. तसेच उर्वरित लोकांसाठी दि. 21 मार्च 2021 रोजीच्या जनता कर्फ्युबाबत कार्यालयाचे दि.10 मार्च 2021 चे आदेश कायम राहतील,असे  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अपर जिल्हादंडाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, शिवकुमार स्वामी  यांनी कळविले आहे.

*****

 
Top