परीक्षार्थींना दुपारच्या संत्राचा पेपर संपेपर्यंत उपकेंद्रावरच थांबावे लागणार

         उस्मानाबाद / प्रतिनिधी:-

महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 उस्मानाबाद शहरातील 13 उपकेंद्रावर होणार आहे.या परीक्षा केंद्रावर 3768 परीक्षार्थी परीक्षा देतील.एकदा परीक्षा उपकेंद्राच्या आवारात परीक्षार्थींनी प्रवेश केल्यानंतर दुपारच्या सत्रातील पेपर संपेपर्यंत त्यांना उपकेंद्राबाहेर जाता येणार नाही.तेव्हा परीक्षार्थींच्या जेवणाचा डब्बा,पाणी बॉटल सोबत आणून पहिला पेपर संपल्यानंतर उपकेंद्राच्या आवारात जेवण करावे लागेल,असे लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

      उस्मादनाबाद जिल्हाक केंद्रावर रविवार दि. 21 मार्च, 2021 रोजी राज्यससेवा पूर्व परीक्षा - 2020  ही सकाळी 10.00 ते 12.00 व दुपारी 03.00 ते 05.00 या दोन सत्रांमध्येा पुढील 13 उपकेंद्रावर घेण्या त येणार आहे. 

उपकेंद्राचा क्रमांक, उपकेंद्राचा नाव, आणि त्या उपकेंद्रावरील परीक्षार्थींची  संख्याव अशी 

    उपकेंद्र क्र. 01 श्रीपतराव भोसले हायस्कूगल, तळ मजला, मेन रोड, -192, उपकेंद्र क्र. 02 श्रीपतराव भोसले ज्यु . कॉलेज, पहिला मजला, मेन रोड, -336, उपकेंद्र क्र.03 श्रीपतराव भोसले ज्युव. कॉलेज, दुसरा मजला, मेन रोड, -360, उपकेंद्र क्र. 04 श्रीपतराव भोसले ज्युभ. कॉलेज, तिसरा मजला, मेन रोड, -408, उपकेंद्र क्र. 05 श्रीपतराव भोसले हायस्कू्ल, (आण्णा  ई टेक्नोज) नवीन इमारत, मेन रोड, -336,उपकेंद्र क्र. 06 रामकृष्णा परमहंस महाविद्यालय, नवीन इमारत, मेन रोड, -240,उपकेंद्र क्र. 07 छत्रपती शिवाजी हायस्कु्ल, तांबरी विभाग, -384, उपकेंद्र क्र.08 विद्यामाता हायस्कु्ल, सांजा चौक, औरंगाबाद बायपास रोड, -240, उपकेंद्र क्र. 09 शासकीय तंत्रनिकेतन, तुळजापूर रोड,-240, उपकेंद्र क्र. 10 अभिनव इंग्लिश स्कुडल, भानु नगर, बजाज शोरुमच्याळ पाठीमागे, मेन रोड, -288 उपकेंद्र क्र. 11 जिल्हाक परिषद कन्यान प्रशाला, शहर पोलीस स्टेकशनजवळ, -264 उपकेंद्र क्र. 12 रामकृष्ण1 परमहंस महाविद्यालय, पहिला मजला, मेन रोड, तांबरी विभाग, पार्ट – A-240, उपकेंद्र क्र. 13, रामकृष्णल परमहंस महाविद्यालय, तळ मजला, मेन रोड, तांबरी विभाग, पार्ट – B-240. 

         या परीक्षेस उपस्थित राहणा-या परीक्षार्थींनी सकाळी एकदा परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश केल्या नंतर त्यां ना दुपारच्या सत्राचा पेपर संपेपर्यंत परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाता येणार नाही. त्या्मुळे त्यां नी त्‍यांच्या जेवणाचा डब्बा्, पाणी बॉटल सोबत आणावी आणि परीक्षा उपकेंद्राच्यात आवारातच जेवण करावे.दुपारच्या सत्राचा पेपर संपेपर्यंत परीक्षा उपकेंद्राबाहेर त्यांना जाता येणार नाही. तसेच परीक्षार्थींना सोबत आणलेला जेवणाचा डब्बाप, पाणी बॉटल, बॅग, मोबाईल फोन्सक तसेच इतर साहित्यण हे उपकेंद्रप्रुमुखांनी उपकेंद्रावरील नेमून दिलेल्या, एका खोलीमध्येम स्वसतःच्याल जबाबदारीवर ठेवावे लागेल.परीक्षेसाठी नियुक्तब अधिकारी /कर्मचारी यांनीही याबाबत कार्यवाही करावयाची आहे. 

        या परीक्षेस उपस्थित राहणा-या परीक्षार्थीकरीता (प्रवेशपत्र जवळ बाळगणारे) तसेच परीक्षेच्या अनुषंगाने कामकाज करण्यासाठी परीक्षा उपकेंद्रावर नियुक्तष करण्या(त आलेल्या  उपकेंद्रपमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपीक आणि शिपाई यांच्याकरीता त्याळचप्रमाणे परीक्षा विषयक कामकाज करणाऱ्या समन्वपय अधिकारी व इतर अधिकारी/ कर्मचारी यांच्याकरीता कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यातच्या अनुषंगाने जिल्हरयात लागू असलेल्या रविवार दि.21 मार्च, 2021 रोजीच्या जनता कर्फ्यूमध्येा सूट देण्यायत आली आहे. उर्वरीत लोकांसाठी दि. 21 मार्च, 2021 रोजीच्याफ जनता कर्फ्यूबाबतसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे दि. 10 मार्च, 2021 रोजचे आदेश कायम राहतील. मात्र या परीक्षा विषयक कामकाज करीताना कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्याेच्याी अनुषंगाने केंद्र आणि राज्यि शासनाकडून, महाराष्ट्रव लोकसेवा आयोगाकडून तसेच स्थादनिक प्राधिकरणांकडून वेळोवेळी जारी करण्यावत आलेल्या  सूचना,आदेश या संबंधित परीक्षार्थींनी तसेच नियुक्ता अधिकारी, कर्मचारी यांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. 

कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्या.च्यात पार्श्वंभूमीवर आयोगाकडून सेवा पुरवठादार संस्थेिची नेमणूक करण्यापत आली आहे. परीक्षेसाठी नियुक्तश अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी व परीक्षार्थींसाठी  Basic Covid Kits, Extra Protective Kits व Personal Protective equipment Kits तसेच Extra 2 & 5 ML Sanitizer Pouch चा पुरवठा करण्याiत आला आहे. तेंव्हा  परीक्षार्थींनी कुठलीही भिती न बाळगता परीक्षा द्यावी,असे आवाहन जिल्हाष केंद्र प्रमुख तथा निवासी उपजिल्हाठधिकारी शिवकुमार स्वा मी यांनी केले आहे.

                                     

 
Top