उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

तालुक्यातील दारफळ ग्रामपंचायतने गावामध्ये वेळोवेळी साठणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन व त्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने पाऊल उचलले आहे.  ग्रामपंचायतचे वतीने दारफळ येथील तळ्याच्या शेजारी असणाऱ्या गायरणामध्ये कमीत दोन वर्षाच्या कचऱ्याचे साठवणूक  करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी जेसीबीच्या साह्याने मोठा खड्डा घेण्यात आला आहे.

यावेळी सरपंच अॅड.संजय भोरे,अनिल जाधव,पोपट भुतेकर, नारायण भोरे,संदीपान ओव्हाळ, राजेश ओव्हाळ, ग्रामपंचायत ऑपरेटर सुनील भुतेकर, रोजगारसेवक रोहित ओव्हाळ, ग्रामपंचायत सेवक समाधान ओव्हाळ आदींची उपस्थिती होती.यामुळे गावातील नागरिकांकडुन कचरा कुंड्यांमध्ये टाकण्यात आलेला कचरा गावाबाहेर हलवणे सोपे होणार आहे. तसेच कचऱ्यापासून पसरणारी दुर्गंधी व घान याला आळा बसून नागरिकांचे आरोग्याची काळजी घेणे सुखकर होणार आहे. त्याचबरोबरीने गावातील स्वच्छता व पर्यावरणपूरक मोहिमेस चालना मिळणार आहे.


 
Top