कळंब / प्रतिनिधी- 

मराठी साहित्य जीवनाशी जोडले गेले आहे, सहित्यकानी शोषण व्यवस्थेबद्दल  साहित्यामधून लिखाण केले पाहिजे, भाषे संदर्भात धोरने  अवलंबण्यासाठी राजकीय मंडळींना दृष्टी नाही. मराठी माणूसच मराठी भाषेचा द्वेष करत असून, ही भाषा गौरवापूर्ती राहिली आहे, अशी खंत मराठी भाषेचे अभ्यासक “ग्रामीण साहित्य, संकल्पना आणि समीक्षा” या पुस्तकाचे लेखक प्रा.डॉ. केदार काळवणे यांनी व्यक्त केली.

 कळंब येथे दोस्ती तुटायची नाय या ग्रुपच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित “गप्पा-टप्पा” कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य जगदीश गवळी हे होते तर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय घुले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे मराठी भाषा ही जगातील पहिल्या दहा भाषेमध्ये बोलणारी महत्त्वाची भाषा आहे. ही भाषा समृद्ध करण्यासाठी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले ,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यांनी मराठी भाषेत साहित्य लेखन केल्याने जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांना मातृ भाषेतच शिक्षण दिले पाहिजे असे मत प्रा.डॉ. केदार काळवणे यांनी व्यक्त केले.

 मराठी भाषा ही शब्दाला महत्त्व देणारी आहे. संत तुकारामाची भाषा हृदयाला भिडते. या मराठी भाषा मुळेच खऱ्या अर्थाने शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकाला न्याय मिळू शकला. मातृभाषेतच शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना, सुव्यवस्थित समजू शकतात, नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दिले जाणारे शिक्षण देखील मातृ भाषेतच दिले जाते.यामुळे पालकांनी मराठी भाषेतील शिक्षणाचा अट्टाहास धरला पाहिजे असे मत संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य जगदीश गवळी यांनी व्यक्त केले.दोस्ती ग्रुप च्या वतीने मराठी स्वाक्षरी अभियान ची सुरुवात ही या वेळी करण्यात आली.

यावेळी पाहुण्यांचा दोस्ती ग्रुप च्या वतीने गुलाब रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी दोस्ती ग्रुप चे संजय घुले, अशोक चोंदे, सुनील हुलसुलकर, सतीश टोणगे, शंकर माने, विठ्ठल जाधव, उपस्थित होते यावेळी प्रा. विठ्ठल जाधव यांनी आभार मानले.

 
Top