शिराढोण / प्रतिनिधी- 

शिराढोण मार्गे कळंब-लातूर ही वादग्रस्त बससेवा कळंब आगार व लातूर आगार या दोन्ही आगाराची उत्पन्न देणारी बससेवा कोलमडून गेली आहे. दर तासाला कळंबहून शिराढोण मार्गे लातूर व दर तासाला लातूरहून कळंबकडे शिराढोण मार्गे असा वेळापत्रक आसून दोन्ही आगाराचे निष्क्रीय आगार प्रमुखांचे आपल्या आगारावर व वाहक-चाक यांच्यावर नियंत्रण नसल्याने वाहक-चालक यांच्या मनमानी कारभारावरच या मार्गावर बससेवा धावत आहे. त्यामुळे प्रवांशाचे हाल होत आहेत.

लातूर आगाराची सांय.५ वा. कळंबहून लातूरकडे धावणारी बस दि. ४ फेब्रुवारी दु.४.३० वा. कळंब बसस्थानकात आली होती. दुपारी २.१५ नंतर बस उपलब्ध नसल्याचे कारण सांगत नियंत्रक जाधवर प्रवाशांना ठणकावून सांगत होते. परंतू लातूर आगाराची बस ही बसस्थानकाच्या पाठीमागे वाहक व चालक यांनी उभी करून गायब झाले होते. प्रवाशांनी प्रचंड गर्दी आसतानाही सदरील बस लातूर आगाराचे निष्क्रीय वाहक-चालकांनी आपली मनमानी दाखवत प्रवाशांची हेळसांड केली. दि. ४ फेब्रुवारी रोजी वाहक व चालक कोण होते त्यांच्यावर कडक कारवाई मागणी ग्रामीण प्रवाशांमधुन होत आहे.

 कळंबहून मुरूडला शिराढोण मार्गे धावणारी बस तासंतास उशीरा धावते. सकाळी ९ वा. शिराढोण बसस्थानकावर येण्याचा वेळ आसूनही ही बस सकाळी ९ वा. कळंब बसस्थनकातून निघते व शिराढोणला १० वा. येते. शिराढोण, पिप्रंी, नायगाव, दाभा, कोथळा, चौसाळा, करंजकल्ला या गावावरून मोठ्या संख्येने विद्यार्थीना ताटकळत बसावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे उस्मानाबाद परिवाहन मंडळाचे मुख्याधिकारी जानराव यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. तसेच रस्तारोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 
Top