उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

32 वा रस्ता सुरक्षा सप्ताह (अभियान) 2021 उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद पोलीस विभाग, उस्मानाबाद यांचे संयुक्त विदयमाने दि. 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी  या कालावधीमध्ये सर्व जिल्हाभर राबविण्यात येत आहे. 

दिनांक 28 जानेवारी रोजी रस्ता सुरक्षाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणेसाठी श्री.गजानन नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली महिलांची हेल्मेट दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हेल्मेट दुचाकी रॅलीमध्ये एकुण 40 महिला व पुरुषांनी सहभाग नोंदविला आहे. सकाळी 11.00 वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद येथून श्री. गजानन नेरपगार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी महिलांच्या हेल्मेट दुचाकी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून उदघाटन केले. सदर रॅली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, तेरणा चौक,  सेंट्रल बिल्डींग, बार्शी नाका , डाँ. आंबेडकर चौक  या मार्गाने जाऊन शिवाजी चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

सदरील रॅलीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील श्रीमती प्रियदर्शनी उपासे, मोटार वाहन निरीक्षक, श्री.प्रशांत भांगे, मोटार वाहन निरीक्षक व श्री. शेखर आचार्य, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच कार्यालयातील कर्मचारी, मोटार ड्रायव्हींग स्कूलचे संचालक उपस्थित होते.

 
Top