परंडा / प्रतिनिधी : - 

तालुक्यातील शेळगाव अंतर्गत भोसलेवस्ती शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शिवाजी महाराज यांचे जीवनातील अंगावर शहारे आणणारे प्रसंग सांगत वक्तृत्व स्पर्धेत रंगत वाढवली.कु.तनुजा पवार वर्ग ३ रा हीने जोषपूर्ण वक्तृत्व करून प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक कु.तेजस्वीनी जरांडे व तृतीय क्रमांक १ली ची विद्यार्थिनी कु.अनुजा पवार हिने मिळवला.

 यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजी मगर, मुख्याध्यापक वैजीनाथ सावंत, महिला सदस्य वंदना मगर तसेच आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top