वाशी / प्रतिनिधी

 वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन शिवाजी महाराज चौक वाशी येथे करण्यात आले .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी होत असताना यंदा प्रशासनाकडून काही सूचना देण्यात आलेल्या आहेत . प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोंत पालन करीत वाशी शिवजयंती साजरी करण्यात आली .तसेच शहरामध्ये अनेक ठिकाणी भगवे तोरण व झेंडे ने लावण्यात आले .त्यामुळे शहरात सणासारखे वातावरण होते .

 
Top