परंडा / प्रतिनिधी : -

 परंडा तालुक्यातील अनाळा येथे दि.१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच जोतीराम क्षिरसागर यांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लहान बालकांनी जिजाऊची वेशभुषा घालुन सर्वांचे लक्ष वेधले होते. 

कार्यक्रमास परंडा भाजपा मिडीया सेलचे तालुका अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर, उपसरपंच दादासाहेब फराटे, ग्रा.पं. सदस्य कल्याण शिंदे,अशोक शिंदे, चांगदेव चव्हाण, विनोद कदम, अजित शिंदे, अप्पासाहेब पाटील,हारीभाऊ शिंदे, प्रकाश शिंदे, मेजर शिवाजी क्षिरसागर, मिठू कदम साजिद शेख, यांच्यासह ग्रामस्थ,शिवप्रेमी युवक मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top