उमरगा / प्रतिनिधी

वाढत चाललेल्या इधनं वाढी मुळे  शेतकरी पुन्हा पारंपारिक पद्धतीने शेती व्यवसा्याकडे वळाला आहे. शेतकऱ्यांना प्रिय असलेली सर्जा राज्या च्या जोडीला पावणे दोन लाखाचां भाव आला आहे.यंदाच्या यात्रा काळात दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती बिरुदेव मंदिर समितीचे व्यवस्थापक मधुकर घोडके यांनी दिली.

तालुक्यातील लातूर गुलबर्गा रोड वरील बिरुदेव यात्रा कमिटीच्या वतीने 26 जानेवारी पासून भव्य पशु पदर्शन आयोजित केले असून एका बैल जोडीला पावणे दोन लाखाचा भाव मिळाला आहे.

 उमरगा रिषदेच्या वतीने प्रत्येक वर्षी या पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते यंदा कोराणाच्या संकटामुळे पालिकेने यात्रा भरवीण्यासाठी असमर्थता दाखवल्या नंतर शेतकऱ्यांचीं गैरसोय होऊ नये म्हणून बिरूदेव यात्रा कमिटीच्या वतीने ही यात्रा भरवण्यात आली आहे या यात्रेला  शेतकरी व्यापाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

 या पशु प्रदर्शनात शेतकऱ्यानी व व्यापाऱ्यानी लाल कंधारी , देवणी , खिल्लार , संकरीत , गिर ही विविध प्रकारची जनावरे खरेदी विक्री साठी आणली आहेत .या यात्रा उत्सवास बिरुदेव मंदिराचे पुजारी मधुकर घोडके, बालाजी घोडके, बालाजी माणिक घोडके, शिवाजी घोडके, जालिंदर सोनटक्के, परमेश्वर दळगडे आदी मंडळी परिश्रम घेत आहेत.

 
Top