तुळजापूर / प्रतिनिधी-  

श्री तुळजाभवानी मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा  मधुन  भाविकांना मंदीरात सोडावे अशी मागणी आरादवाडी भागातील रहिवाशांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आरादवाडीत भागात आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जावुन मंदिराकडील भागाची पाहणी करत  त्या मंडळीच्या समस्या ऐकुण हा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्याबाबतीत  मुख्याधिकारी,तहसिलदार यांच्याशी चर्चा करुन आपल्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .

 यावेळी नगराध्यक्ष श्री.सचिन रोचकरी, श्री.विनोद गंगणे, श्री.अविनाश गंगणे, श्रीआनंद कंदले ,श्रीनाथ शिंदे,औदुंबर कदम आदी उपस्थित होते.

 
Top