उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तालुक्यातील पळसवाडी येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम सुरू आहे. सदरील रस्त्यासाठी गाव नकाशाप्रमाणे सरकारी जागा असताना ही  शेतकऱ्यांच्या शेताला टोकरून नियमबाह्य पध्द्तीने रस्ता केला जात आहे, याची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा युवक समितीने केली आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील पळसवाडी येथे होणाऱ्या रस्त्यासाठी पुरेशी जागा असतानाही दोन्ही बाजूने पाणी जाण्यासाठी जागा उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी जाण्यासाठी चारी खोदल्या जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला कारण नसतानाही विनाकारण नियमबाह्यरिस्त्या अरूंद रस्ता केला आहे. त्यामुळे गट नंबर १२८, १२६, १२५,१२१, ११८,११४ मधील शेतकऱ्यांंचे प्रचंड नुकसान होत आहे. ग्रामीण विकास संस्था कार्यालय कांही जणांचे हित संबंध जोपासण्यासाठीच नियमबाह्यरित्या रस्त्याचे काम करीत आहे. विशेष म्हणजे यापुर्वी २४ जुलै २०१९ रोजी तक्रार करून देखील योग्य दखल घेतली गेली नाही. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना न्याय दयावा, ग्रामीण सडक योजना कार्यालयाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. न्याय न मिळाल्यास ११ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. 

निवेदनावर रोहित पडवळ, उमेश राजे निंबाळकर, सिध्दार्थ बनसोडे, राम कदम,अभिषेक बागल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top