उस्मानाबाद/ प्रतिनिधी

गरजू रुग्णांच्या मदतीसाठी नेहमीच धावून येणार्‍या अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला यांना कोरोना योद्धा सन्मानपत्राने गौरविण्यात आले. उस्मानाबाद शहरातील वैरागरोड येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित सर्वरोग निदान शिबिरप्रसंगी कोरोना लॉकडाऊनकाळात गोरगरीब कुटुंबांना तसेच रुग्णांना मदत करणार्‍या आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानपत्र देण्यात आले.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के. पाटील तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे,  वैद्यकीय अधिकारी डॉ.शकील अहमद  खान, तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे, डीवायएसपी मोतीचंद राठोड, तालुका आरोग्य अधिकारी ऐवळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे, डॉ.किरण गरड, शहजाद वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष गफार शेख, सामाजिक कार्यकर्ते अजहर चाँद शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पल्ला यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.


 
Top