उस्मानाबाद/ प्रतिनिधी

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स(कैट)च्या वतीने जीएसटी कायद्यातील जाचक व अन्यायकारक तरतुदी विरोधात २६ फेब्रुवारी २०२१ शुक्रवार रोजी “भारत व्यापार बंद” पुकारण्यात आला आहे,या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व व्यापारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.

 नुकतेच नागपुर येथे पार पडलेल्या कैटच्या तीन दिवसीय राष्ट्रीय व्यापार संमेलनात या भारत व्यापार बंदची घोषणा करण्यात आली होती,केंद्र सरकारने जीएसटी कायदा अंमलात आणताना इतर अनावश्यक कर संपवण्याचे आश्वासन दिले होते,एक देश एक कर अशी संकल्पना राबविण्याचे गोड स्वप्न व्यापाऱ्यांना दाखविण्यात आले होते,परंतु या बाबतचे आश्वासन केंद्र सरकारने पाळले नाही आतापर्यंत या कायद्यात ९३७ वेळा संशोधन करुन विश्वविक्रमच केला आहे,एवढेच नव्हे तर या करप्रणालीच्या सॉफ्टवेअरमध्ये ३ वर्षात जवळपास १००० वेळा बदल केले आहेत.एखाद्या व्यावसायीक कायदयात इतके बदल अनाकलनीय आहेत.

 १ जानेवारी २०२१ पासुन अंमलात येत असलेल्या नवीन तरतुदी अत्यंत जाचक आहेत,व्यापारी कर सल्लागार,सनदी लेखापाल यांना अत्यंत किरकोळ चुकीसाठी तुरुंगवासाची तरतुद आहे ती भारतातल्या कोणत्याही उद्योजकास व्यापाऱ्यास मान्य नाही. व्यापाऱ्यांचा अधिकतम वेळ हा त्यांच्या व्यवसायात जाण्याऐवजी जीएसटी कायद्याच्या पुर्ततेतच चालला आहे त्यामुळे तो देशोधडीला लागत आहे.

 या विरोधात जिल्ह्यातील सर्व व्यापारी,कर सल्लागार,वाहतुक व्यावसायिक,पेट्रोल पंप चालक,हॉटेल व्यावसायिक एक दिवसीय व्यापार बंद मध्ये उतरणार आहेत.

 कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सभा,चक्काजाम,धरणे व रॅली स्थगीत करण्यात आली आहे.या दिवशी जिल्ह्याभरातील सर्व तालुका व शहर व्यापारी संघटना आपले व्यवसाय बंद ठेवुन स्थानीक प्रशासनास निवेदन देऊन आपला विरोध नोंदवणार आहेत.उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघातर्फे आवाहन करण्यात येत आहे

 
Top