तुळजापूर  /  प्रतिनिधी  - 

 नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे  महिलेसाठी राखीव असताना देखील, तुळजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे पुरुष नगरसेवक हे गेली 4 वर्षा पासून भूषावत असून हा शासनाने दिलेल्या संविधानाचा अवमान आहे.  तरी तुळजापूर नागरपालिकेचे नगराध्यक्ष पद रद्द करून शासनाने दिलेल्या महिला आरक्षणास योग्य न्याय देण्यात यावा,अशा मागणीचे निवेदन  मा.जिल्हा अधिकारी यांना विरोधी सदस्यांनी दिले.

निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर नगरपरिषदचे नगराध्यक्ष पद माहिलासाठी राखीव होते, यापुर्वीच्या महिला नगराध्यक्ष या 22/6/2018रोजी अपाञ ठरल्या तरी अपाञ कारवाई विषय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे याचीका दाखल केली असुन यात सदर जागेचा निवडणुक कार्यक्रम घेवु नये उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे 

नगरपरिषदचे नगराध्यक्ष पद महिलासाठी राखीव असताना प्रभारी नगराध्यक्ष नावाखाली  पुरुष नगराध्यक्ष हे नगराध्यक्ष पदाचा लाभघेत आहेत. मुळ आरक्षण महिलासाठी असल्याने येथे महिला नगराध्यक्ष असणे गरजेचे आहे तरी जिल्हाधिकारी यांनी शाषण आदेश आरक्षण प्रमाणे महिला नगराध्यक्ष निवड करणे बाबतीत आदेश द्यावेत ही कारवाई पंधरा दिवसाचा आत करावी, असे निवेदनात म्हटले आहे. याचा प्रति  निवड आयुक्त विभागीय आयुक्त यांना सादर केल्या आहेत.

या निवेदनावर काँग्रेसचे नगरसेवक अमर मगर, सुनिल रोचकरी,  आरती इंगळे, राहुल खपले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top