उस्मानाबाद/ प्रतिनिधी

अज्ञान, अंधश्रध्दा आणि अस्वच्छतेने ग्रासलेल्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या 145 व्या  जयंती निमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

 यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उपजिल्हाधिकारी पुनवर्सन श्रीमती शुभांगी आंधळे,जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक कुलकर्णी, वाघमारे,अव्वल कारकून मोरे, देवकर, नरसिंह ढवळे, चव्हाण, गायकवाड, केंद्रे, चौधरी, महसूल सहायक गजभार आदींची प्रमुख उपस्थिती होती

 
Top