उमरगा / प्रतिनिधी

 पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यानंतर जिल्हाधिकारी यांचे सुचनेनुसार उमरगा शहरात विना मास्क फिरणा-या नागरीकावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पोलिस व पालिकेच्या संयुक्त पथकाने ४ दूकानदारासह दोन दिवसात ३० लोकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

 मोठया कालखंडानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात वाढत चाललेल्या रुग्णसंख्येमुळे सुरक्षित अंतर व मास्कचा वापर सर्वाना बंधनकारक करण्यात आला आहे. कोरोना नियमांचे कटाक्षाने पालन करण्यात यावे यासाठी उमरगा पोलिस व नगर पालिका प्रशासनाच्या वतीने संयुक्त पथक नेमण्यात आले आहे. या पथकाने दोन दिवसांत मास्क न लावलेल्या २८ जणाला प्रत्येकी ५०० रुपये दंड तर मास्कविणा दुकानात प्रवेश देणे व गर्दी करणा-या चार दुकांदारांना प्रत्येकी ५०० रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या दोघावर प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे दंडाची आकारणी करण्यात आली.

 
Top