उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील शिव नृसिंह ग्रुप शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कोरोना या महाभयंकर महामारीच्या काळात आपल्या कुटुंबासह स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तेर ग्रामस्थांच्या सुरक्षे बरोबरच कोरोना या महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे तेर ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, पत्रकार यांचा   सत्कार करण्यात आला.                                                         

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा केल्यानंतर तेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन कोठावळे , प्रयोगशाळा तंत्रज्ञ लक्ष्मीकांत मुंडे , प्रयोगशाळा सहाय्यक तंत्रज्ञ प्रिया सुर्यवंशी , परिचारिका सुषमा पस्तापुरे , आशा सुपरवाझर संगीता डोलारे , आशा स्वयंसेविका कविता आंधळे ,  मिरा गाढवे , दैवशाला भोरे , सुषमा सरवदे , रेखा पांगरकर , स्वाती पवार , रेश्मा नानजकर ,  लतिफा कोरबू , राणी वाघ , अंगणवाडी कार्यकर्ती जोशीला लोमटे , ग्रा प कर्मचारी वैभव डिगे , अशपाक शेख , अल्केश पोहरेगावकर , आशीष वाघमारे , पत्रकार सुभाष कुलकर्णी , बापू नाईकवाडी , सुमेध वाघमारे आदी कोरोना योध्दाचा सन्मान करण्यात आला.

 यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मंगेश पांगरकर , उपाध्यक्ष अविनाश इंगळे , सचिव हरी खोटे , खजिनदार वैभव वैरागकर शोभायात्रा प्रमुख अक्षय कोळपे , निखिल पांगरकर , अभिजित लामतुरे , स्वप्नील इंगळे , किशोर गाढवे , गजानन मांजरे , सुरज पांगरकर , सिध्देश्वर शिराळ , धीरज शिराळ , तुषार बुके , किरण खोटे , वैभव बडवे , राहुल इंगळे , गणेश उटगे  आदिंसह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top