औरंगाबाद /वृत्तसंस्था-

 पेट्रोल पंपावरून हॅन्डपंपने डिझेल चोरणारी उस्मानाबाद जिल्ह्यातील आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून डिझेल चोरीचे एकूण ३६ गुन्हे उघडकीस आणून ९८,४९,४२० रुपयांचा मुद्येमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जालना, बीड, लातूर, सोलापूर, अकोला, अमरावती, जळगांव, धुळे, नाशिक, अहमदनगरसह तीन राज्यांत त्यांनी धूमाकूळ घातला होता. चोरी केलेले डिझेल ते स्वतच्या ट्रकमध्ये टाकून गुजरातमधील तापी नदीतून वाळूची वाहतूक करायचे. उरलेले डिझेल ओळखीतल्या ट्रकचालकांना विकत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १७ फेब्रुवारी रोजी फिर्यादी प्रदीप प्रल्हाद राठोड (४० वर्ष, व्यवसाय- पेट्रोलपंप चालक, रा. प्लॉट नं. १२६, एन -३ सिडको, औरंगाबाद) यांनी पोलीस ठाणे चिकलठाणा येथे फिर्याद दिली की, दि. १६ फेब्रुवारी रोजी त्यांचे चितेगांव शिवारातील B.P.C.L पेट्रोल पंपावरून ३,०००,४५ रुपयांचे ३४८० लिटर डिझेल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या फिर्यादीवरून पोलीस ठाणे चिकलठाणा येथे गु.र.नं ६२/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

उस्मानाबाद जिल्ह्याचे कनेक्शन- या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषनाआधारे माहिती मिळाली की, हा गुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील लक्ष्मीपेढी (तेरखेडा, ता. वाशी) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार रामा पान्या पवार व त्याच्या साथीदारांनी केला. ही टोळी गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातून वाळू भरुन ती वाळू उस्मानाबाद जिल्हयात विक्री करते. वाळू वाहतुकीच्या ट्रकमध्ये ही टोळी वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर जाऊन रात्रीच्या वेळी पंपावरील डिझेलच्या टाकीतून प्लास्टीकच्या हातपंपाच्या साहयाने डिझेलची चोरी करत असे. चोरीचे डिझेल ते त्यांच्या जवळील वाळू वाहतुकीच्या ट्रकमध्ये टाकून उरलेले डिझेल हे त्यांच्या ओळखीच्या इतर ट्रक चालक व मालक यांना स्वस्त दरात विक्री करत असे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्नड तालुक्यातील शिवराई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ यावरील नवीन टोलनाक्यावर सापळा रचला. गुजरातकडून वाळू भरून येणाऱ्या गाड्यांची तपासणी करीत असताना ट्रक क्रमांक MH – 04 – EB 7689, MH-25- U-1540, MH-12-HD-8235 एका मागोमाग आल्या. याट्रक मध्ये अनुक्रमे (१) धनाजी महादेव पोळ (३५ वर्ष, व्यवसाय- ट्रक चालक रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), (२) रामा सुबराव काळे (३०, ट्रक चालक, रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), (३) गुलाब उर्फ गुलब्या गणपु काळे (१९, क्लिनर, रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), (४) दशरथ लक्ष्मण काळे (१९ वर्ष, क्लिनर, रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), (५) रामा पन्या पवार (३०, ट्रक चालक, रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), (६) उध्दव बापू शिंदे (२१, चालक, रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), (७) गणेश काळू पवार (२३, क्लिनर, रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), (८) लक्ष्मण पन्या पवार (४०, चालक, रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), (९) विकास मच्छिद्र काळे (२१, चालक, रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), (१०) राजेंद्र शहाजी काळे (१९, चालक, रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), (११) नितीन बापू पवार (क्लिनर, रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), (१२) किरण अर्जुन काळे (क्लिनर, रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) हे मिळून आले.

 
Top