तुळजापूर / प्रतिनिधी

 तिर्थक्षेञ तुळजापूरात श्रीतुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना पंचक्रोषी त विविध प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी तुळजापूरविकासप्राधिकरण अंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा प्रेक्षणीय स्थळांचा ठिकाणांचे  आणखी सौदंर्य वाढविण्यासठी  रामोजी फिल्म सिटीचे काम करणारे  आर्ट्रिक्स मिडीया अ‍ॅण्ड एन्टरटेनमेंट, पुणेचे  डायरेक्टर - अभय येतावडेकर यांनी  आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या समावेत तुळजापूर शहरा मध्ये प्राधिकरण अंतर्गत झालेल्या कामाची पहाणी केली.

यात एस टी काँलनी येथील तलाव परीसर, पार्कींग कडील भवानी तिर्थ कुंड, पापनाश तिर्थकुंडाची पहाणी केली व या प्रेक्षणीय स्थळांचे सौदंर्य वाढावे  यासाठी येथील जागे बाबत सुधारीत प्लँनिग करावी, अशी सुचना केली . तसेच  सुधारीत आराखडा तयार करण्याच्यसा सुचना दिल्या व हा सुधारीत आखाडा तुळजापूर विकासप्राधिकरण बैठकीत मांडुन त्यास मंजुरी घेवुन हे तिर्थक्षेञ तुळजापूराते सौदंर्य वाढविणारे कामे सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला.

 या पाहणी दरम्यान  आमदार राणादादा,आर्ट डिझायनर अभय येतवाडेर,नगराध्यक्ष सचिन रोचकरी,विनोद गंगणे,अविनाश गंगणे,अभिजीत कदम नगरपरिषद ,अभियंता प्रशांत चव्हाणसाहेब आदी उपस्थित होते.


 
Top