तुळजापूर / प्रतिनिधी

शासकीय विश्राम गृह येथे आयोजित बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राजरत्न कदम, तालुकाध्यक्ष पदी विनोद जाधव,तु विधानसभा अध्यक्ष पदी  (सामाजिक व न्याय विभाग) दत्ता कांबळे  तर तालुका उपाध्यक्ष पदी समाधान रोकडे,  तालुका सरचिटणीस पदी समाधान धाकतोडे तर  तुळजापूर शहराध्यक्षपदी  आकाश शिंदे  तर शहर उपाध्यक्ष पदी किरण कांबळे यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवुन करण्यात आल्या.

बैठकीत ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे , प्रदेश सरचिटणीस अशोक जाधव(सामाजिक व न्याय)राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे  व   तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top