कळंब / प्रतिनिधी-

शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून,रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे ही प्रमाण वाढलेले आहे.सावित्रीबाई फुले शाळा ते प्रियदर्शनी बँक,नरेश जोशी यांचे घर ते डॉ.शिंदे यांचा दवाखाना ही दोन्ही रस्ते तयार करण्याची गरज आहे.या भागात शाळा, दवाखाना असल्याने मोठी वर्दळ असते.या भागातील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे असल्याने, वाहतुकीला अडथळा होत आहे.स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम चालू असून,या रस्त्याला जोडणारे हे  दोन्ही रस्ते असल्याने, न.प. ने तत्काळ करून घ्यावेत या मागणी चे निवेदन न.प. मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. 

    या निवेदनावर शिवसेनेचे गट नेते शिवाजी  कापसे,नगर सेवक सतीश टोणगे,  पत्रकार विलास मुळीक,नरेश जोशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top