उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद शहरातील दि.14 फेब्रुवारी-2021 रोजीचा व लोहारा तालुक्यातील मार्डी येथील दि.15 फेब्रुवारी-2021 रोजी होणार दोन अल्पवयीन ‍  बालिकांचे  बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. 

 जिल्हाधिकारी कौस्तुभ ‍दिवेगावकर,मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ.विजयकुमार फड  व पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्या आदेशानुसार बी. एच. निपाणीकर, ए. बी. कोवे व पोलीस निरिक्षक बुधवंत तसेच पोलीस उपनिरीक्षक ए.एन. वाढोरे (लोहारा) व विस्तार अधिकारी ढाकणे यांच्या सूचनेनुसार बी. एच. निपाणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण्‍ अधिकारी ए.बी. कोवे व ‍विस्तार अधिकारी लोहारा ढाकणे व पोलीस अधिकारी बुधवंत यांच्या सुचनेनुसार उस्मानाबाद शहरातील आई लॉन्स्‍ आणि मार्डी लोहारा या ठिकाणी  अगदी गुपचूप होणारे बालविवाह अगदी शेवटची घटका जवळ आली असता थांबविण्यात आले.

 यावेळी सुपरवायझर (मार्डी) श्रीमती एम.एस रेणसूरे, बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विभावरी खुने, पोलीस उपनिरिक्षक पोलीस स्टेशन (लोहरा) ए.एन. वाढोरे, बीट अंमलदार (मार्डी) एच.एन.पापुलवार, समाज कार्यकर्ती प्रज्ञा बनसोडे,समुपदेशक कोमल धनवडे व ‌क्षेत्रीय कार्यकर्ती जयश्री पाटील, बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामसेवक (मार्डी) सय्यद एफ.आय. ,पोलीस कॉन्सेबल (उस्मानाबाद) किरण लेंडगे,अशोक पाव्हणे,बालाजी काटकर तसेच मार्डी ग्रामस्थ अण्णासाहेब पाटील, गिरी ज्ञानेश्वर,जमादार एम.एस.,सौ.कोकरे डी. व्ही. कमल बाडकर,बळी ढेंगील यांच्या प्रयत्नाने हे नियोजित बाल विवाह रोखण्यात यश मिळाले आहे.


 
Top