उमरगा / प्रतिनिधी

उस्मानाबाद येथे  उस्मानाबाद जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय रोलर स्केटींग स्पर्धा संपन्न झाल्यात या स्पर्धेत ११, १२ व १७  वर्ष वयोगटातील मुले-मुली सहभागी झाले होते. या  स्पर्धेत उमरगा येथील सहभागी स्पर्धकांनी घवघवीत यश मिळविले आहे. सदरील स्पर्धा तुळजाभवानी स्टेडियमवर आयोजित करण्यात आल्या होत्या. 

या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत उमरगा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असून ११ वयोगटातील स्पर्धेत कु. मनस्वी घोडके  प्रथम , गौरी जाधव द्वितीय तर मुलांमध्ये अर्जून कवठे तृतीय क्रमांक मिळविला अहे. तसेच१२ वर्षे वयोगटात कु जान्हवी घोडके  प्रथम तर प्राची भोसले तृतीय क्रमांक पटकाविला आहे. १७ वर्षेखालील वयोगटात साई राठोड प्रथम क्रमांक मिळविला आहे. या सर्व यशस्वी स्पर्धकांना रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष जयंत जगदाळे, सचिव प्रविण गडदे, अभय वाघोलीकर, निशांत होणमुडे, प्रतापसिंग राठोड,  श्रीमती स्वामी आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सर्व यशस्वी खेळाडूंचे उमरगा आणि परिसरात कौतुक होत आहे.

 
Top