उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ऑक्टोबर २०२० च्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले अधिकांश बाधित शेतकरी तांत्रिक कारणांमुळे पिक विम्याच्या हक्काच्या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य सरकारची भूमिका जाहीर करण्याचे आश्वासन कृषी मंत्री श्री.दादाजी भुसे यांनी देऊनही अद्याप याबाबत ठोस कार्यवाही होताना दिसून येत नाही. शासनाकडून चालढकल होत असल्यामुळे पुढील रणनीती ठरविण्यासाठी रविवारी सकाळी ११:०० वाजता शिंगोली सर्किट हाऊस, उस्मानाबाद येथे शेतकऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे ठरविले आहे.,

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२० अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९,४८,९९० अर्जाद्वारे ५,१८,०६५.५१ हेक्टर क्षेत्रासाठी रुपये २,०५,४१४.८९ लक्ष इतका विमा संरक्षित करून घेतला होता. त्यासाठी शेतकरी हिस्सा रुपये ४,१८५.५९ लक्ष राज्य हिस्सा रुपये ३२,२९५.४८ लक्ष आणि केंद्र हिस्सा रुपये २७,४२१.८४ लक्ष असे एकूण रुपये ६३,९०२.९१ लक्ष विमा हप्ता म्हणून विमा कंपनीस मिळाला आहे.

कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी नंतर जिल्ह्यात एकूण ७९,१२१ तक्रारी अर्ज विमा कंपनीकडे प्राप्त झाले असून त्यातील ६९,२३१ अर्ज पात्र आहेत. त्यासाठी नुकसान भरपाई रक्कम ही रुपये ८,३५६.८५ लक्ष मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ४८,४४२ अर्जदारांना रुपये ४,९२१.५७ लक्ष इतकी रक्कम वाटप करण्यात आली असून २०,७८९ अर्जदारांची रुपये ३,४३५.२८ लक्ष इतकी रक्कम प्रलंबित आहे.,

या उलट अतिवृष्टी व पुरामुळे अतोनात नुकसान झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय / राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने काही प्रमाणात मदत केली. जिल्हा महसूल प्रशासनाने केलेल्या प्रक्रियेतून उमरगा, लोहारा, तुळजापूर व उस्मानाबाद या चार तालुक्यांची व इतर तालुक्यातील काही गावांची पैसेवारी ५० च्या आत आली आहे. पिक विम्याशी संबंधित पिक कापणी प्रयोगातून जिल्ह्यात शेतमालाचे उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त असल्याने पिक विमा देय नाही, असा निष्कर्ष कृषी विभागाने काढला आहे. परंतु प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या

 
Top