उस्मानाबाद/ प्रतिनिधी

आजच्या विज्ञानवादी व माहिती तंञज्ञानाच्या  युगात स्ञी ही,प्रत्येक क्षेञात पुरूषांच्या बरोबरीने कार्य करत आहे.तरीही टॅलेंटअसूनही परिस्थितीने दबलेल्या कुटुंबातील मुली या मागे पडत आहेत आशा महाविद्यालयातील गरिब कुटुंबातील मुलींना सक्षम होण्यासाठी आज महाविद्यालयाच्या वतीने ड्रेस व पुस्तके वाटप करत आहात यामुळे मला आनंदच आहे तरीही या मुलींना सक्षम होण्यासाठी शाश्वत अशी मदत करावी असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूरच्या सचिव मा.प्राचार्या शुभांगी गावडे यांनी  दि.६फेब्रुवारी रोजी केले.

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील गरजु व गरिब विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या वतीने ड्रेसचे वाटप समारंभात केले आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्या सुलभा देशमुख होत्या.यावेळी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख,प्र.प्राचार्य डाॅ.कठारी,मुरलीधर गावडे होते. उपस्थित होते.प्रारंभी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात सुसज्ज अशा विश्राम गृहाचे भूमिपुजन प्राचार्य शुभांगी गावडे यांचे हस्ते टिकाव मारून करण्यात आले.

प्रास्ताविक करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव  देशमुख म्हणाले की,डाॅ.बापुजी साळुंखे यांचे विचार व कार्य पुढे ठेऊनच आम्ही काम करतो.महाविद्यालयात अनेक मुली हालाकीच्या परिस्थितीतून शिक्षण घेताहेत त्या मुलींना हातभार लागावा म्हणून आज ७७गरजु व गरिब मुलींना ड्रेस वाटप करत आहोत व थोडासा पालकावरच्या डोक्यावरील ओझे कमी करत आहोत.याचे समाधान मिळते आहे.पुढे बोलतांना  प्राचार्या शुभांगी गावडे म्हणाल्या की,आज आपण गरिब मुलींना आधार दिला आहे.आज प्रत्येक क्षेञात महिला कर्तबगारी बजावत आहेत आज स्ञीकडे केवळ स्ञी म्हणून न पहाता तिच्याकडे एक शक्ती म्हणून पहावे व गरिब मुलींना भविष्यात शाश्वत अशी मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले

कार्यक्रमाचे आयोजनात प्रा.डाॅ.विद्या देशमुख,प्रा.डाॅ.महाडिक मॅडम,प्रा.सौ.सरवदे मॅडम यांनी सहकार्य केले. सूञसंचालन श्रीमती बी.व्ही.गोंदकर यांनी केले आभार प्रा.स्वाती बैनवाड यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील विद्याथी—विद्यार्थिनी  शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top