उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ जिल्हा शाखा उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्हा परिषद उस्मानाबाद चे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयकुमार फड यांचा हरी नर्के लिखित महात्मा फुले समग्र वाड्मय देऊन  सत्कार करण्यात आला .

यावेळी समाज कल्याण विभाग अंतर्गत शिष्यवृत्ती प्रस्तावाबाबत वेळ वाढवून देण्याची विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करण्यात आली. समुपदेशन प्रक्रिया लवकर घेणेबाबत ,तसेच ओबीसींच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली मा डॉक्टर विजयकुमार फड साहेब यांनी सर्व प्रश्न ऐकून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायत शिक्षण विभागाच्या विविध योजना गावात कर्मचाऱ्यांनी राबवाव्यात असे आवाहन त्यांनी केले .माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या आहवानास  प्रतिसाद देत जिल्हा परिषदेतील  विविध योजना गाव स्तरावर राबवण्यास सर्वोतपरी सहकार्य करण्याचे संघटना पदाधिकारी यांनी मान्य करत स्वतःचे गावात सुशिक्षित तरुणांसाठी करत असलेल्या बाबी पदाधिकार्यांनी सांगताच साहेबांनी समाधान व्यकत केले .

  यावेळी जिल्हा अध्यक्ष सुखदेव भालेकर, कार्याध्यक्ष सुहास दाराडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष भोजने, अनंत फुलसुंदर , जिल्हा संघटक रविराज राठोड, गजानन बुवा, पांडुरंग माळी, आनंद गायकवाड, मोहन वाघमोडे, अंबादास विरोधे, प्रशांत लांडगे, परमेश्वर सगट  यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

 
Top