उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राष्ट्रीय चर्मकार महासंघा तर्फे  उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी या गावातील राम गायकवाड या तरुणास पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.  या तरुणांची  “कॅनडा या देशांमध्ये इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट” या कोर्ससाठी निवड झालेली आहे .त्याच्या शिक्षणाचा खर्च हा किमान 17 लाख रुपये आहे, परंतु त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.

यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य नितीन (बप्पा) शेरखाने,जिल्हाध्यक्ष अॅड.गणपती कांबळे, जिल्हा सचिव तथा स्वराज्य  शिक्षक संघटनेचे प्रदेश संघटकबबनराव वाघमारे सर, राज्य कार्यकारणी सदस्य धोंडीराम वाघमारे, भारत कांबळे इत्यादी बांधव उपस्थित होते. 

 
Top