उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 जागतिक महामारी कोरोनाचा बहर ओसरल्यानंतर प्रथमच  उस्मानाबादकर रसिकांना संगीत रजनी मेजवानी मिळाली.नगरसेवक युवराज नळे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी “साल नया गीत पुराने” या जुन्या गीत गझलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम शीर्षक फलकाचे अनावरण  राणाजगजितसिंह पाटील माजी राज्यमंत्री तथा आमदार तुळजापूर , प्रा.डॉ. अरविंद देशमुख- अध्यक्ष , मायक्रोबायलॉजी सोसायटी इंडिया शुभहस्ते श्रीमती अस्मिता कांबळे, अध्यक्षा जि.प. उ. बाद, मकरंद राजेनिंबाळकर नगराध्यक्ष न.प. उ. बाद, आबा इंगळे  उपनगराध्यक्ष , नितीन तावडे अध्यक्ष म.सा.प., नेताजी पाटील माजी जि.प. अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. 

शहरातील कलाकारांना प्रोत्साहन प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने मान्यवराच्या हस्ते सहभागी गायक कलाकारांचा संकल्पीत प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुधीरआण्णा पाटील, राजेंद्र अत्रे,माधव गरड,राजसिंहा राजेनिंबाळकर, विशाल शिंगाडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून संगीत रजनी चा शुभारंभ करण्यात आला.साल नया गीत पुराणे या कार्यक्रमाचे समन्वयक शेषनाथ वाघ यांनी प्रास्ताविक केले तर युवराज नळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की उस्मानाबाद जिल्ह्यातील नवनवीन गायक कलावंतांना आपली गायनकला रसिकांसमोर आणण्यासाठी दरवर्षी या मंचाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात येईल.

क्षितिजा ज्ञानराज निंबाळकर,अॅड.दिपक पाटील मेंढेकर, अनिल मालखरे, मकरंद राजेनिंबाळकर, तौफिक शेख, महेश उंबर्गीकर,शकील सिद्दिकी, शामसुंदर भन्साळी, धनंजय कुलकर्णी,शरद वडगावकर, रवींद्र कुलकर्णी, अभिजित शेळके,मुनीर शेख, नितीन भन्साळी,स्वराज राजेंद्र भोसले, अक्षय शामसुंदर भन्साळी,लखन मुकुंद पाटील, सुजित अंबुरे, अक्षता नळे, प्रगती शेरखाने, सुनील फल्ले, जयश्री नलवडे,शेषनाथ वाघ, युवराज नळे या हौशी गायकांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस व सुमधुर जुन्या गीत गझलांच्या अविट गोडीने उस्मानाबादकर मंत्रमुग्ध होऊन गेले. आपापला काम धंदा नोकरी उद्योग व्यवसाय राजकारण सांभाळत असताना स्वतामधील गायनकला जोपासून केलेल्या प्रत्येक सादरीकरणाला उस्मानाबादकरांनी अगदी उत्स्फूर्तपणे भरभरून दाद दिली.सर्वसहभागी एकत्र कलाकारांच्या स्वरात “इतनी शक्ती हमें देना दाता..”  या समुहगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचलन प्रभाकर चोराखळीकर व प्रा.प्रशांत गुरव यांनी केले, तर आभार तौफीक शेख यांनी मानले.कार्यक्रमाला रसिक संगीत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top