वाशी / प्रतिनिधी- 

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे डॉ. बी. वाय यादव (अध्यक्ष श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी) यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचा “जीवनगौरव पुरस्कार” मिळाल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र कठारे, श्री.दिलीप रेवडकर, श्री.जयकुमार शितोळे, श्री.शशिकांत पवार, श्री.चंद्रकांत मोरे, श्री.सुरेश कवडे, श्री.सदाशिव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

 डॉ. बी. वाय यादव म्हणाले कि ‘’संस्कांरांनी जी मंडळी सामाजिक कार्य करतात ते एक आदर्श व्यीक्तीीमत्वच असते. सामाजिक कार्य करताना कधीही गरीबी सांगू नका. जूनी माणसे तरूण पिढीवर चांगले संस्का‍र घडविण्याचे कार्य करतात. त्यातमुळे नवी पिढीने त्यांरच्याी आदर्शावर चालावे.’’ असे मत त्यांनी यावेळी मांडले.

 सार्वजनिक शिवजयंती उत्सव कमिटी वाशी व  इतरांनी  प्रत्येकी अकरा हजार अकराशे अकरा रुपये बार्शी येथील ट्रामा केयर सेंटरला यावेळी निधी दिला. तसेच या वेळी छत्रपती शिवाजी विद्यालय चे मुख्याध्यापक कै.कोकाटे सर यांचे ह्र्दय विकाराने निधन झाल्यामुळे त्यांना श्रधांजली वाहण्यात आली .

 या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक प्रा.शाम डोके यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.अशोक पाटील,  आभार प्रा.श्रीकांत गपाट यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका  कर्मचारी उपस्थित होते.


 
Top