तुळजापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत शहरातील अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला.

शहरातील गणेश पाटील, अतिलेश पुराणीक, सागर फडके, अक्षय मगर, अजिंक्य पाटील, अकाश चव्हाण, गणेश घुगे, अकाश काशीद, विकी पाटील, गणेश पुराणीक आदी युवकांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष जैनोदीन शेख, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी, रोजगार, स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोवींद बनपट्टे आदी उपस्थित होते.

 
Top