उमरगा  / प्रतिनिधी:

डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या धम्म क्रांतीला गतिमान करण्यासाठी प्रत्येकानी परिणाम कारक धम्माचे आचरण करावे. धम्म आपनास नवसजीवणी देतो आपल्या संसारात दुःख नाहीसे करण्यासाठी बुद्ध शिकवनीचे आचरण करावे असे प्रतिपाद भन्ते सुमेध नागसेन यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील दाळींब येथील भीमनगरात माघ पौर्णिमेच्या निमित्त्याने शनिवारी दि 27 रोजी तथागत भगवान बुद्धाच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली भन्ते धम्मसार, भन्ते सुमेध नागसेन यांनी पालिपूजा घेऊन मूर्तीची स्थापना केली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा प्रा अस्मिता कांबळे, समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे, पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, भारतीय बोद्ध महासभेचे अध्यक्ष प्रा डी. ए. निकाळजे, सुरेश वाले,बाबा जाफरी, सरपंच सोमनाथ कुंभार,जीप सदस्य धनराज हिरमुखे, उपसरपंच इरफान जहागीरदार, ग्रामविकास अधिकारी भास्कर वैराळे, आदींची उपस्थिती होती.

प्रारभी राष्ट्रीय महामार्गवरील शासकीय विश्राम गृहापासून बुद्धमुर्तीची भव्यमिरवणूक काढण्यात आली. बुद्ध सरण गच्छामी च्या नींनादात शुभ्र वस्त्र परिधान करून बौद्ध अनुयायी मोठया सखेने सहभागी झाले होते.दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीमनगर येथील बुद्ध विहारात मूर्तीची स्थापना करण्यात आली. या वेळी भते धम्मसार,दिग्विजय शिंदे, बाबा जाफरी डी, ए निकाळजे, संतोष सुरवसे, सचिन पाटील, भास्कर वैराळे, आदीची भाषणे झाली.

या वेळी बोधिस्तव बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी संदीपान सुरवसे, भीमाशंकर सूर्यवंशी, प्रा दिगबर गायकवाड, खंडेराव सुरवसे, सुधाकर गायकवाड, विश्वभर गायकवाड,अभिमन्यू गायकवाड,आदिनी पुढाकार घेतला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. एल. कांबळे यांनी केले अभिमन्यू गायकवाड यांनी आभार मानले मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 
Top